हिरे व्यापाऱ्याची रोकड घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर भररस्त्यात हल्ला करून ३५ लाखांची रोकड लुटण्यात आली. माझगाव येथील भगवान आदित्यनाथ मार्गावरील प्रेरणा हॉस्पिटलजवळ बुधवारी संध्याकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव येथे राहणारे संदीप पाठारे (४३) आणि अशोक झवेरी (५२) हे दोघे कर्मचारी हिरे व्यापाऱ्याकडे काम करतात. संध्याकाळी मालकाचे पैसे घेऊन येत असता मोटारसायकलीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले.
हे दोघे कर्मचारी पायी निघाले होते. या चौघांनी संदीप पाठारे यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि हातातली बॅग पळवून नेली. हे चौघांनी आपल्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचे कापड गुंडाळले होते. हल्लेखोर नंतर दादरच्या दिशेने पळून गेले. संदीप पाठारे यांना हल्ल्यात किरकोळ जखमी झाले. भायखळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
माझगाव येथे भररस्त्यात ३५ लाखांची लूट
हिरे व्यापाऱ्याची रोकड घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर भररस्त्यात हल्ला करून ३५ लाखांची रोकड लुटण्यात आली. माझगाव येथील भगवान आदित्यनाथ मार्गावरील प्रेरणा हॉस्पिटलजवळ बुधवारी संध्याकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली.
First published on: 20-06-2013 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 lakh robbery at mazgaon