मुंबईतील जुहू चौपाटीवर फिरायला गेलेली ५ मुलं सोमवारी ( १२ जून ) समुद्रात बुडाली होती. यातील एकाला वाचविण्यात यश आलं होतं. तर, ४ जण बेपत्ता होते. या चार जणांचे मृतदेह कोळीवाडा परिसरात आढळून आले आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अरबी समुद्रात वाऱ्यासह मोठ्या लाट्या उसळल्या होत्या. त्यामुळे समुद्रकिनारी फिरायला जाऊ नये, असं आवाहन महापालिकेने केलं होतं. तरीही ५ मुलं जुहू चौपाटीवर फिरायला गेली होती. “ते समुद्राच्या काठावर बसली असताना ४.५ मीटरची लाट आली. यात पाचही जण वाहून गेले,” असं एका बचावकर्त्याने सांगितलं.

हेही वाचा : पतीचे कथित प्रेमप्रकरण संपवण्यासाठी पत्नीची भोंदूबाबाकडे धाव;  भोंदूबाबा विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलं बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरफचे पथक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण, पाच जणांपैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे.