गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवयवदानाच्या संख्येत वाढ झाली असून, बुधवारी मुंबईमध्ये ४२ वे यशस्वी अवयवदान पार पाडले. यामध्ये मेंदूमृत ५५ वर्षीय पुरुषाच्या नातेवाईकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे दोन जणांना जीवदान मिळाले आहे.

हेही वाचा- “एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी उपचारादरम्यान मेंदू मृत झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्या पुरुषाच्या नातेवाईकांना अवयवदानासंदर्भात माहिती देऊन त्यांचे समुपदेशन केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास मान्यता दिली. त्यानंतर डॉक्टरांनी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला सूचना देऊन अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली. या पुरुषाचे मूत्रपिंड आणि डोळ्याचे बुब्बुळ दान करण्यात आले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अवयव वितरित करण्यात आले. २०२२ मधील हे ४२ वे अवयवदान असून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त अवयव दान झाले आहेत. यामध्ये मूत्रपिंड (३५), यकृत (२३), हृदय (२०) यांचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर फुप्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे आणि हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे.