डोंबिवलीत अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीला इमारतीच्या दुसऱया मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीतील शुभदा नर्सिंग होममध्ये सुनंदा गायकवाड या महिलेने पाच दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला होता. गुरूवारी सकाळी एका अज्ञाताने मुलीला पाळण्यातून पळवले आणि इमारतीच्या दुसऱया मजल्यावरून खाली फेकून दिले. घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चिमुकलीला फेकून दिलेला व्यक्ती फरार असून पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला आहे.

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल