मुंबई : मुंबईत सोमवारी ५८४ नवीन करोनाबाधित आढळले. यापैकी ५२२ रुग्णांना लक्षणे नाहीत. सापडलेल्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमीच आहे. सोमवारी ४०७ रुग्ण बरे झाले. आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी ५२२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. यातील ६२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी १४ जणांना प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध कराव्या लागल्या. सध्या ५ हजार २१८ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सोमवारी ७ हजार २१५ चाचण्या करण्यात आल्या. बरे झालेल्या रुग्णाचा दर हा ९७.८ टक्के आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २ हजार ५०६ जणांचा २४ तासांत शोध घेण्यात आला आहे. सध्या एकही झोपडपट्टी, चाळ, इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.

ठाणे जिल्ह्यात १८६ बाधित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी १८६ करोना रुग्ण आढळून आले आहेत, तर जिल्ह्यात एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.  जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांपैकी ठाणे ६३, नवी मुंबई  ६२, कल्याण- डोंबिवली ३४, मीरा- भाईंदर १२, ठाणे ग्रामीण नऊ, उल्हासनगर तीन, बदलापूर पालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १ हजार ६०४ आहे.