मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांसाठीच्या २४१७ घरांच्या सोडतीतील विजेत्या कामगार आणि त्यांच्या वारसांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर संपली. गुरुवारी वांद्रे येथील समाज मंदिर सभागृहात ५८५ पात्र विजेत्यांना आणि त्यांच्या वारसांना चावी वाटप करण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कोन, पनवेल येथील भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील २४१७ घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. त्यानंतर विजेत्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्यात आली. पण अनेक कारणाने या घराचा ताबा मिळाला नव्हता. अखेर घराचा ताबा देण्यातील सर्व अडचणी दूर करत गुरुवारी ५८६ पात्र विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आला.

हेही वाचा – जरांगे-पाटील यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकामुळे कॉ. पानसरे यांची हत्या, कुटुंबियांचा उच्च न्यायालयात दावा

गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे आणि आमदार कालिदास कोळबकर यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. आता जसेजसे विजेते पात्र ठरतील तसतसे घराचे वितरण केले जाणार आहे.