मुंबई : अकरावीच्या चौथ्या विशेष प्रवेश फेरीनंतर मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटय़ातील जागांवर अर्ज करणाऱ्या एकूण २ लाख ५९ हजार १३६ (८९.९६ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. अकरावीच्या तब्बल १ लाख २९ हजार ९९  जागा रिक्त असून अर्ज केलेल्या जवळपास २८ हजार ९१८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी आहे.

 प्रवेशाची पाचवी विशेष प्रवेश यादी सोमवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. पाचव्या विशेष प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार, ११ सप्टेंबर (सकाळी १० वाजल्यापासून) ते शुक्रवार, १५ सप्टेंबर  या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी