मुंबई :  अकरावीच्या पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीत मुंबई विभागात ६७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केले असून जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सामावून घेण्यात येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी ६७ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप १ लाख ९३ हजार ७८० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असतानाही १२ हजार ४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. यंदा मुंबई महानगरात केंद्रीय फेरीसाठी २ लाख ३२ हजार ६९० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीसाठी २ लाख ३७ हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्ज वैध ठरले होते. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी साधारण १ लाख ६४ हजार जागा उपलब्ध असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 67 thousand students admission or fyjc confirmed in the first round zws
First published on: 07-08-2022 at 04:21 IST