मुंबई : राज्यात मागील दोन महिन्यांत झिकाचे आठ रुग्ण सापडले असून, पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व महानगरपालिकांमधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबत मार्गदर्शनही करण्यात आले.

हेही वाचा >>> ‘महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट बंदी, हा तर तालिबानी फतवा’; शिंदे गटाच्या आमदाराने केली कारवाईची मागणी

झिका हा एडीस डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. एनआयव्हीच्या पथकाने जुलै २०२१ मध्ये पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व परिंचे येथे दिलेल्या भेटीच्या वेळी झिकाचा पहिला रुग्ण सापडला. आजपर्यंत राज्यामध्ये झिकाचे एकूण २९ रुग्ण सापडले आहेत. मे आणि जून या दोन महिन्यांत अनुक्रमे दोन आणि सहा असे एकूण आठ रुग्ण सापडले आहेत. जूनमधील सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंढवा आणि एरंडवने या गावात सापडले आहेत. तसेच मेमध्ये कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक असे एकूण दोन झिकाचे रुग्ण सापडले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व महानगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

हेही वाचा >>> अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

राज्यातील झिका रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राष्ट्रीय विषाणू परिषदेच्या तज्ज्ञांनी राज्यातील सर्व महानगरपालिकांतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, सहाय्यक संचालक यांना १ जुलै रोजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबत मार्गदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिका आजार कशामुळे पसरतो

झिकाचा प्रादुर्भाव एडीस डासामुळे होतो. एडीस डासांचा प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हा आजार झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात जावे. कोणताही ताप अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.