मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची वडाळ्यामधील ॲन्टॉप हिल परिसरातील ४१७ घरे ऑगस्ट २०२३ च्या सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या घरांपैकी काही घरे विकली गेली नाहीत. या रिक्त घरांसह याच प्रकल्पातील नवी ८७ घरे मंडळाने आपल्या आगामी सोडतीत समाविष्ट केली आहेत. ही घरे अत्यल्प गटातील असून या घरांसाठी ४० ते ४१ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई मंडळाने मुंबईतील सुमारे दोन हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्याची तयारी सुरू केली आहे. या सोडतीत आता ॲन्टॉप हिल येथील नवीन इमारतीतील ८७ घरांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या २२ मजली  इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीला निवासी दाखलाही प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ८७ घरांचा समावेश आगामी सोडतीत करण्यात आला आहे. या इमारतीचा समावेश असलेल्या प्रकल्पातील ४१७ घरांसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये सोडत काढण्यात आली होती.  मात्र काही कारणांमुळे काही घरे विकली गेली नाहीत. त्यामुळे रिक्त घरे आगामी सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>Hit and Run : ग्लोबल बारवर हातोडा, आदित्य ठाकरे म्हणतात, “मिहीरच्या घरावर बुलडोझर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲन्टॉप हिल येथील अत्यल्प गटातील ही घरे ३०० चौरस फुटाची आहेत. मागील सोडतीत ही घरे ४० लाख रुपयांना विकण्यात आली होती. आता आगामी सोडती समाविष्ट करण्यात आलेल्या रिक्त आणि नवीन घरांच्या किंमतीत कोणतीही मोठी वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घरांच्या किंमती ४० ते ४१ लाख रुपयांच्या आसपास असतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.