मुर्तिजापूर आणि उर्से टोल नाका या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊजणांची मृत्यू झाला आहे.
अकोलाजवळील मुर्तिजापूर येथे मारुती व्हॅनची ट्रकला धडक लागून सातजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका महिलेसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी आहेत. उर्से टोल नाक्याजवळ झालेल्या या अपघाताची नोंद तलेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एक्सयूव्ही ही गाडी पलटी झाल्याने अपघात झाल्याचे कळते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2014 रोजी प्रकाशित
दोन अपघातांत नऊजण ठार
मुर्तिजापूर आणि उर्से टोल नाका या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊजणांची मृत्यू झाला आहे.

First published on: 01-12-2014 at 09:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 dead in two diffrent accident