मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या हल्ल्यात मृत तरुणाचा भाऊही जखमी झाला आहे. चंदू देवेंद्र असे मृत तरुणाचे नाव असून तो अ‍ॅन्टॉप हिल येथील रहिवासी आहे. पूर्व वैमनस्यातून दोन आरोपींनी चाकूने चंदूवर हल्ला केला. दादर पूर्व येथील खारेघाड जंक्शन परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात चंदू गंभीर जखमी झाला.

हेही वाचा – ‘वाघनखा’वरून फडणवीस विरुद्ध आदित्य

हेही वाचा – स्वच्छतेचा जागर! राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार पाहिल्यानंतर देंवेंद्रचा भाऊ अप्पू (२३) यानेही भावाला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर दोघांनाही शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान चंदूचा मृत्यू झाला. त्यानंतर अप्पूच्या तक्रारीवरून याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सूत्रांनी सांगितले.