मुंबई: अखेर पीडित महिलेची मृत्यूशी झुंज संपली; अँसिड हल्ला झालेल्या ५४ वर्षीय पीडित महिलेचा १८ दिवसांनी रुग्णालयात मृत्यू | A 54 year old female victim of an acid attack died in hospital after 18 days mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: अखेर पीडित महिलेची मृत्यूशी झुंज संपली; अँसिड हल्ला झालेल्या ५४ वर्षीय पीडित महिलेचा १८ दिवसांनी रुग्णालयात मृत्यू

काळबादेवी परिसरातील फणसवाडी भागातील सामाजिक कार्यकर्त्या गीता वीरकर (५४) यांच्यावर १३ जानेवारी रोजी त्यांचा सहकारी महेश पुजारी (६२) याने अॅसिड हल्ला केला होता. यात त्या सुमारे ५० टक्के भाजल्या होत्या.

dead
सांकेतिक फोटो

काळबादेवी परिसरातील फणसवाडी भागातील सामाजिक कार्यकर्त्या गीता वीरकर (५४) यांच्यावर १३ जानेवारी रोजी त्यांचा सहकारी महेश पुजारी (६२) याने अॅसिड हल्ला केला होता. यात त्या सुमारे ५० टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, १८ दिवसांनी त्यांची मृत्यूशी झुंज संंपली. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महेश पुजारी याला एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली असून कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>‘अदानी’ने ‘एफपीओ’ गुंडाळला; गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय

गेल्या २५ वर्षांपासून गीता वीरकर आणि महेश पुजारी हे एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, महेशच्या दारूच्या व्यसनामुळे तो गीता यांना वारंवार त्रास देत होता. महेश दारू आणि जुगारासाठी गीता यांच्याकडे सतत पैसे मागायचा. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण होत होते. १३ जानेवारी रोजी त्यांच्यात वाद झाल्याने महेशने गीता यांच्यावर अॅसिडचा हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>>अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्याने मुंबईकरांची निराशा

गीता यांना प्रथम भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर १४ जानेवारी रोजी मसिना रुग्णालयात हलवण्यात आले. अँसिड हल्ल्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. . त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर १८ दिवस उपचार करण्यात आले. मात्र, अखेर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महेश पुजारीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या तुरुंगात आहे, अशी माहिती एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:27 IST
Next Story
मुंबई महापालिकेचे उद्यान प्रदर्शन उद्यापासून कार्यशाळेसाठी आज नोंदणी करता येणार