घाटकोपर परिसरात बुधवारी भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात बुधवारी दुपारी १च्या सुमारास हा अपघात झाला. कामराज नगर परिसरात राहणारा रिक्षाचालक राजू यादव हा त्याच्या मित्रासोबत सुधा पार्क परिसरात उभ्या असलेल्या एका मोटारगाडीत बसला होता. मोबाइल चार्ज करण्यासाठी त्याने गाडीची चावी फिरवली आणि अचानक गाडी सुरू झाली. त्याने ब्रेकऐवजी एस्कलेटरवर पाय दिल्याने गाडीने वेग घेतला. त्यानंतर मोटारगाडी तीन रिक्षा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला धडकली.

हेही वाचा >>> “तेव्हा गिधाडं कुठे होती?” अमित शाहांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनाही मोटारगाडीने धडक दिली. या अपघातात एका शालेय विद्यार्थीसह एकूण सातजण जखमी झाले. राजेंद्र बिंद (४९), सपना सनगरे (३५), आदित्य सनगरे (९), वैष्णवी काळे (१६), जयराम यादव (४६), श्रध्दा सुशविरकर (१७) आणि भरतभाई शहा (६५) अशी जखमींची नावे असून स्थानिक रहिवाशांनी जखमींना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर असून पंतनगर पोलिसांनी मोटारगाडीचा चालक राजू यादव (४२) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.