मुंबई : देशभरातील २१ रेल्वे भरती मंडळामार्फत भारतीय रेल्वेतील विविध पदांसाठी नुकताच भरती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये तब्बल १८ लाख ४ हजार उमेदवारांची नोंदणी केली होती. मात्र यामधील ११ लाख ४० हजार ९३१ उमेदवारांनी विविध केंद्रांवर परीक्षा दिली. परिक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ६२ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. तर, ६ लाख ९९ हजार ४१६ उमेदवार गैरहजर राहिले.

भारतीय रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलट, स्थानक व्यवस्थापक, लोकल व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, कमर्शियल क्लर्क, ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सिग्नल, टेलिकम्युनिकेशनमधील विभागीय सहाय्यक या पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत २९ राज्यातील १५६ शहरांमधील ३४६ केंद्रांवर दररोज तीन पाळीमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १८ लाख ४० हजार ३४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ लाख ४० हजार ९३१ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ६ लाख ९९ हजार ४१६ उमेदवार गैरहजर राहिले.

हेही वाचा…Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात आजपासून ५ दिवस पाणी कपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधार आधारित प्रमाणित वापरून १०,४२,९५५ उमेदवारांची (९१ टक्के) यशस्वी पडताळणी करण्यात आली. हे या परिक्षेचे वैशिष्ट्य असल्याचे असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.