मुंबई : येस बँकेचे कर्ज बुडवून ४०० कोटींच्या फसवणुकीतील आरोपी अजीत मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक गन्हे शाखा मेननचा शोध घेत होती. पण तो ब्रिटनमध्ये राहत असल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी आहे.

मेननला दिसताक्षणी अटक करण्याच्या सूचना देशातील सर्व विमानतळांना देण्यात आल्या होत्या. त्याच्या आधारावर मेनन केरळ येथे आला असता त्याला पकडण्यात आले. येस बँकेची फेब्रुवारी २०२१ मध्ये सुमारे ४०० कोटींची फसवणूक केल्याबद्दल कॉक्स अँड किंग्ज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कॉक्स आणि किंग्सची कंपनीच्या उपकंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. केरकर यांच्या सूचनेनुसार मेनन हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा…मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश

येस बँकेचे मुख्य दक्षता अधिकारी आशिष विनोद जोशी यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी,२०२१ मध्ये अजय पीटर केरकर, त्यांची पत्नी उर्शीला केरकर आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कॉक्स अँड किंग्ज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीतर्फे पर्यटनासाठी, तसेच शिक्षणासाठी कर्ज आणि नॉन बँकिंग कर्ज उपलब्ध करण्यात येत होते.

तक्रारीनुसार २०१८ ते २०१९ या वर्षात कंपनीच्या हिशोब वह्यांमध्ये बनावट नोंदी केल्या. त्यातून कंपनीची स्थिती चांगली असल्याचे दाखवले. त्याद्वारे ७ सप्टेंबर २०१९ ते १ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत येस बँकेकडून ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या रकमेपैकी ३४७ कोटी ४० लाख रुपये आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी कॉक्स अँड किंग्ज लिमिटेडकडे वळवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात बँकेचे ३९८ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान करून आरोपींनी आर्थिक फसवणूक केली.

हेही वाचा…सलमान खानच्या मुंबईतल्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज

याप्रकरणी ईडीही तपास करीत आहे. केरकर आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपी मेमन याने कर्ज मंजुरी पत्रावर स्वाक्षरी केली होती. या कटात मेमन सहभागी असल्याचा संशय असून त्याच्या सूचनेनुसार कर्जाची काही रक्कम कॉक्स ॲण्ड किंग्स कंपनीत नियमबाह्यरित्या हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप आहे.