मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे, मला हा माणूस खूप आवडतो. ते मुख्यमंत्री असल्यासारखं कधी वावरत नाहीत. चुका असतील तर मान्य ही करतात.  त्यांची ही वृत्ती फार छान आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. मुंबईतील व्हीजेटीआय इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मी भाजपचा प्रवक्ता नाही किंवा इतर कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस अत्यंत परखड व काटेकोरपणे बोलत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांची मुलाखत पाहिली. अत्यंत स्पष्टपणे त्यांनी आपल्या हातातून झालेल्या चुका मान्य केल्या. त्या चुका कशा कमी करता येतील, याबद्दलही भाष्य केले. त्यांची ही वृत्ती फार छान आहे. हा माणूस मुख्यमंत्र्यांसारखा वागत नाही. विशेष म्हणजे भाजपच्या काळात एकही भ्रष्टाचार समोर आला नसल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले.

girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Ashok Chavan, Congress
अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

सध्याचा एकही नेता शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्यासारखा नाही. उगाच मोठमोठ्या आवाजात ते ओरडतात. यामुळे लोकांच्या कानाला त्रास होतो, हे त्यांना कधी कळणार, असा उपहासात्मक सवालही विचारला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नानांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.

नानांनी यावेळी फेरीवाल्यांचे समर्थन केले. फेरीवाले आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हणत फेरीवाले चुकीचे नसल्याचे ते म्हणाले. यासाठी महापालिका, प्रशासन यांचीच चूक आहे. त्यांनी फेरीवाल्यांना जागा का दिली, याला आपणच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटातील काही किस्से सांगताना त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. तसेच कोकणी माणसांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.