मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी ‘चतुरस्त्र अभिनेत्री’ म्हणून आसावरी जोशी (Aasavari Joshi) ओळखल्या जातात. अभिनय क्षेत्रानंतर आता आसावरी यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आसावरी जोशी या लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीचे मुख्यालयात छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आणखी वाचा : “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण भारतातच…”, अजान, हनुमान चालीसा प्रकरणावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : सई ताम्हणकरला मिळाला तिचा ‘दौलतराव’? इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर करत म्हणाली…

आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. नव्वदच्या दशकात ‘सर्फ अल्ट्रा’च्या जाहिरातीतील ‘ढूंढते रह जाओगे’ हा त्यांचा डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता.

आणखी वाचा : एप्रिल फूलचा विनोद पडला महागात, Video शेअर करत अंशुमन विचारेच्या पत्नीने केली ‘ही’ विनंती

१९८६ मध्ये आलेल्या ‘माझं घर, माझा संसार’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पन केलं होतं. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. २००१ मध्ये दुरचित्रवाणीवरील ‘ऑफिस-ऑफिस’ या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट ‘प्यार जिंदगी है’ हा होता. आसावरी यांनी १९८९ मध्ये ‘धाम धूम’ आणि ‘एक रात्र मंतरलेली’ या चित्रपटांत काम केले. तर १९९१ मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी यांची १९९३ मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका ‘जबान संभालके’ मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती. ‘सुखी संसाराराची १२ सुत्रे’ आणि ‘बाल ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांचाही आसावरी या भाग होत्या. त्यांची ‘फॅमिली नंबर १’ या मालिकेतील शालिनीची भूमिकाही फार गाजली होती.