मुंबई : बीसीए, बीएमएस, बीबीए, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांची अतिरिक्त प्रवेश परीक्षा ४ ऑगस्ट रोजी झाली असून, या परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २९ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेला सुरू होणार आहे.

बीसीए, बीबीए, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी अनेक विद्यार्थ्यांना देता न आल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ४ ऑगस्ट रोजी अतिरिक्त सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच २९ ऑगस्टपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच १३ सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीसाठी ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात २९ हजार ७९१ मुले तर १९ हजार ४३० मुलींनी आणि ४ तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा : अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी विशेष प्रवेश यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर होणार, महाविद्यालय पसंतीक्रम १० ऑगस्टपर्यंत बदलता येणार

दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

हेही वाचा : वेळेत उपचार न मिळाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

प्रवेश प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक

अतिरिक्त सीईटी निकाल : २८ ऑगस्ट (तात्पुरती)

ऑनलाइन अर्जनोंदणी : २९ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर

अंतरिम गुणवत्ता यादी : ९ सप्टेंबर

हरकती व तक्रारी : १० ते १२ सप्टेंबर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतिम गुणवत्ता यादी : १३ सप्टेंबर