लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: उन्हाळी सुट्टीमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेसला तात्पुरत्या कालावधीसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक २२९०८ हापा-मडगाव एक्स्प्रेसला ५ एप्रिलपासून आणि गाडी क्रमांक २२८०७ मडगाव – हापा एक्स्प्रेसला ७ एप्रिलपासून शयनयान श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. तसेच गाडी क्रमांक २०९१० पोरबंदर – कोचुवेल्ली एक्स्प्रेसला ६ एप्रिलपासून आणि गाडी क्रमांक २०९०९ कोचुवेल्ली – पोरबंदर एक्स्प्रेसला ९ एप्रिलपासून शयनयान श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकड़ून सांगण्यात आले.