खार पोलिसांनी कोलकाता येथून इंद्राणी बोराचा पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आली आहे. घटस्फोट झाल्यानंतरही इंद्राणी व संजीव परस्परांच्या संपर्कात होते. शीनाच्या हत्येनंतर संजीव अचानक श्रीमंत झाला होता.
संजीव खन्ना आणि इंद्राणी बोरा यांना विधी नावाची मुलगी असून ती लंडनमध्ये आहे. खन्नाशी घटस्फोट घेतल्यानंतर इंद्राणीने पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केले; परंतु ती संजीवच्या संपर्कात होती. सुरुवातीला किरकोळ केबलचा व्यवसाय करणारा संजीव खन्ना अचानक श्रीमंत झाला. इंद्राणी त्याला आर्थिक मदत करत होती. तीन वर्षांपूवी संजीवने कोलकाता येथे भागीदारीत १४:५९ नावाचे आलिशान हॉटेल उघडले. तसेच इंद्राणीने त्याला हावडा येथे एक सदनिका विकत घेऊन दिली होती. इंद्राणी आणि संजीवच्या या आर्थिक संबंधाबाबत संजीवच्या जबानीनंतर अधिक प्रकाश पडणार आहे.
शीनाची हत्या केल्यानंतर पेणमध्ये ज्या ठिकाणी तिचा मृतदेह टाकला त्या जागेची पूर्वपाहणीसुद्धा संजीवनेच इंद्राणीसोबत केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sheena die indrayanies first husband rich
First published on: 28-08-2015 at 06:38 IST