मुंबई : क्रेडाय-एमसीएचआय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए मैदानात १३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईत मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन उत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती देण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात इतरत्र घर खरेदी करण्याची संधी मिळावी, एका छताखाली अनेक पर्याय उपलब्ध व्हावेत, तसेच गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. करोनामुळे गेली तीन वर्षे यात खंड पडला होता. आता पुन्हा एकदा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर चार दिवसीय मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा : मुंबई : गणेशोत्सवातील भाजपच्या बॅनरवरून वाद ; युवासेना पदाधिकाऱ्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल

क्रेडाय-एमसीएचआयने संयुक्तरित्या १३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी फेस्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात ८५ हून अधिक विकासक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांना अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देणार आहेत. तसेच २५ हून अधिक बँका, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थाही यात सहभागी होत असून ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सणासुदीच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती देण्यात येणार आहेत.