सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. राज्यात गारपीट झाल्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण पंचनामे करायला कोणीही नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय तुम्ही या सरकारला आदेश द्या, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला खडसावले. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा- संजय गायकवाडांनी शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून अजित पवार संतापले; म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील आमदारांनी…”

काय म्हणाले अजित पवार?

राज्यात झालेल्या गारपिटीने आठ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. काही जनावरांचाही मृत्यू झाला आहे. तसेच फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय तुम्ही या सरकारला आदेश द्या, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गायकवाडांच्या विधानावरून सत्ताधाऱ्यावर टीका

पुढे बोलताना संजय गायकवाडांनी शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या विधानावरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतपिकांचे पंचनामे हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत झाले आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्र हा दुहेरी कात्रीत सापडला आहे. सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात, असे वक्तव्य केले. अशा पद्धतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार असाल तर कामे कशी होतील? असे टीका त्यांनी केली.

हेही वाचा – भारतातल्या १ लाख कोटींच्या ‘शत्रू मालमत्ते’ची विक्री होणार, सर्वाधिक मालमत्ता उत्तर प्रदेशात, तर महाराष्ट्रात…!

कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन

दरम्यान, माणुसकीची भावना ठेवून कामावर रुजू व्हावे आणि नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करावेत असे आवाहन त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले.