राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः अजित पवार व छगन भुजबळ यांनीच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच लक्षणं दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करण्याचं आवाहनही केलं.

अजित पवार म्हणाले, “काल मी करोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी.”

छगन भुजबळ म्हणाले, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने करोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. तसेच लक्षणे दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.”

हेही वाचा : करोना मृतांची संख्या दुप्पट; तीन आठवडय़ांपासून संकट पुन्हा तीव्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील करोना संसर्ग झाला होता. उद्धव ठाकरे मातोश्रीवरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.