ठाकरे गटाचे समर्थक खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून राजन विचारेंच्या पत्राची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा – ‘मशालीचा चटका बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्त्युत्तर; म्हणाले, “अजरामर असलेला गणपत वाणी…”

काय म्हणाले अजित पवार?

“ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या जीवाला आणि कुटुंबियांना धोका असल्याची माहिती मला काल मिळाली. तसे पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे. खरं तर सरकारे येत-जात असतात. लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसाधारण व्यक्ती, प्रत्येकाचं संरक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडून गेलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या पत्राची दखल घेण्यात यावी, अशी मी विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करतो” , अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“केवळ राजन विचारे नाही, तर इतर कोणालाही अशी शंका असेल, मग कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, राज्य सरकारने त्याकडे लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा –“शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय आहे प्रकरण?

ठाकरे गटाचे समर्थक असलेल्या राजन विचारे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना एक लिहिले. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच ठाणे जिल्हातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.