मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी ( १७ ऑगस्ट ) रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर युवासेना, मनसे विद्यार्थी सेना आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चालू आहेत. युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र डागलं. यावरून निवडणुकीला स्थगिती मिळाल्यावर बाहेर पडतात, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घेण्यासाठी मुख्यमंत्री घाबरत आहेत’, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, “निवडणुकीवेळी लपून बसतात आणि स्थगिती मिळाल्यानंतर बिळाच्या बाहेर पडतात. निवडणुकीत उतरावे. त्यांच्या १० सिनेट सदस्यांनी ५ कामे दाखवावीत. स्थगिती मिळाल्यानंतर का बोलत आहात?”

हेही वाचा :भाजपाचं ‘दुकान’ जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त! स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर नितीन गडकरींचा मार्मिक टोला

“निवडणुका पुढे ढकलणं, हा पर्याय नाही”

“वातावरण कोणाविरोधात आहे आणि कोणाच्या बाजूने हे, निवडणूक झाल्यावर कळेल. भीती वाटल असेल, तर निवडणुका पुढे ढकलणं, हा पर्याय नाही. मैदानात उतरा. तुम्ही चुकीचे आहात, म्हणून तुमच्याविरोधात वातावरण आहे. ही लोकशाही असून, लोकांना बोलून द्या,” असे आव्हान अमित ठाकरे यांनी भाजपाला दिले.

हेही वाचा : “…तेव्हा अंबादास दानवेंचा जन्मही झाला नव्हता”, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मैदानातून पळणं हा पर्याय नाही”

राज्यपाल, उच्चशिक्षण मंत्री आणि विद्यापीठाकडून निवडणुकीच्या स्थगितीबाबत स्पष्टीकरण आलं नाही, असा प्रश्न विचारल्यावर अमित ठाकरे यांनी म्हटलं, “ज्यांच्या हातात विद्यार्थ्यांचं आयुष्य आहे, ते निवडणूक स्थगित केल्याचं स्पष्टीकरण देत नाहीत. बोगस नोंदणी असेल, तर मान्य करू. पण, कितीदिवस बोगस नोंदणी रद्द करण्यासाठी घेणार आहात? मैदानातून पळणं हा पर्याय नाही.”