बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. मनसेच्या कार्यक्रमात अमिताभ यांनी हजेरी लावल्याने यातून उत्तर भारतीयांचा अमिताभ यांनी अपमान केल्याचे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
राज तेरी गंगा..
तसेच आगामी निवडणुकांसाठी मतांवर डोळा ठेवून राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केल्याचा आरोपही अबू आझमी यांनी केला आहे.
अबू आझमी म्हणाले, “अमिताभ बच्चन यांनी राज ठाकरेंच्या कार्य़क्रमाला उपस्थिती दर्शविणे हे अतिशय दु:खद होते. राज ठाकरेंनी आजपर्यंत उत्तर भारतीयांचा अपमानच केला आहे. त्यामुळे अमिताभ यांनी राज ठाकरेंना समस्त उत्तर भारतीयांची माफी मागण्यास सांगितले पाहिजे होते.” असेही आझमी म्हणाले.
फोटो गॅलरी: राज-अमिताभ वादावर पडदा
राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून परप्रांतियांच्या मुद्द्यावरून कटूता निर्माण झाली होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि राज-अमिताभ वादावर पडदा पडला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2013 रोजी प्रकाशित
अमिताभ बच्चन यांच्याकडून उत्तर भारतीयांचा अपमान- अबू आझमी
बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली.
First published on: 25-12-2013 at 11:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan sharing dais with raj thackeray an insult to north indians sp leader