मुंबई: राज्यात डान्सबारला बंदी असताना कांदिवली येथील ‘सावली बार ॲन्ड रेस्टाॅरन्ट’ मध्ये डान्सबार सुरु होता. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा २२ बारबाला अश्लिल नृत्य करीत होत्या. हा बारबालांचा ‘पिक अप पाॅईन्ट’ होता. एकीकडे लाडक्या बहीणींचे आर्शिवाद घेता आणि दुसरीकडे बहीणींना डान्सबार मध्ये नाचवता, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी केला. या आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले.. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जनसामान्यांचा विचार करुन राज्यात डान्सबारला बंदी घातली. काही बंधने पाळून वाद्यवृंदाला परवानगी आहे मात्र कांदिवलीतील ‘सावली बार ॲन्ड रेस्टाॅरेन्ट’ मध्ये डान्सबारवर पोलिसांनी ३० मे रोजी छापा टाकून २२ बारबालांना ताब्यात घेतले होते. त्या अश्लील नृत्य करीत होत्या. तेवढेच ग्राहक होते. चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई व माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे आहे. कदम यांच्या आईच्या नावे हा परवाना असल्याने त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप परब यांनी केला
. खेड येथील जगबुडी नदीमुळे जीवीतहानी झाली होती. त्यातील गाळ उपसण्याचा निर्णय शासनाने घेतला. या उपसातून निघणारी वाळू ही प्राधान्याने शेतकऱ्यांच्या घरकुलासाठी देण्याचे ठरले होते पण जगबुडी मधून निघणारी वाळू सध्या योगिता दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आहे. या नदीत बेकायदा उत्खन्न झाले आहे. पंप लावून उत्खन्न केले जात आहे. राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अकिब सुलेमान यांना वाळू उपसाचे कंत्राट देण्यात आले आहे.परवानगीपेक्षा जास्त काढण्यात आलेली वाळू कोणाच्या घशात गेली, असा सवाल परब यांनी केला.
शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप
पावसाळी अधिवेशनात संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाले. आमदार संजय गायकवाड यांनी उपहारगृहाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. योगेश कदम यांच्यावरही परब यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले.