मुंबई : देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात हा प्रकार घडला आहे.

अर्ज, मुलाखती, नियुक्ती पत्रे असे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या लाखो तरुणांपैकी काही हजार उमेदवारांनाच प्रत्यक्ष नोकरी मिळत आहे. त्यातही हक्काची, हमखास नियुक्ती मिळणाऱ्या तरुणांनाही रोजगार मेळाव्यातून नोकरी मिळाल्याचे दाखवण्यात येत आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागात घेतलेल्या रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी मिळविलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रेल्वे मेळ्यांतर्गत एकूण ९०४ जणांची भरती झाली. रोजगार मेळ्याव्यात एकूण ४२ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली आहे. महापदी यांनी यावेळी महाराष्ट्रातील किती जणांना भरती केले, याची माहिती विचारली असता, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. बेरोजगारांना व रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी रोजगार मेळावा सुरू केला होता. याद्वारे देशातील रेल्वेमार्फत तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनिअर ड्राफ्ट्समन, ही पदे व इतरांना यात सामील केले जाईल.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

हेही वाचा – भुयारी ‘मेट्रो ३’ची चाचणी सुरू, मेअखेरीस भुयारी मेट्रोतून प्रवास शक्य; मुंबईकरांना दिलासा

रेल्वेतील कर्मचाऱ्याचा कार्यकाळात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येते. वर्षानुवर्षे अशी नोकरी दिली जाते. मात्र, अनेकांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागली आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार मेळाव्यातून नोकरी लागल्याची जाहिरात करण्यात येत आहे. – वेणू नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन