मनी माफिया’ या मालिकेमध्ये बदनामी केल्याप्रकरणी ॲमेझॉन , व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरी यांना अरूण गवळी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या मालिकेत गवळी यांचा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावाही, करण्यात आला आहे. दरम्यान ॲमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरी यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>राज ठाकरेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले “अरे गधड्या तुझी लायकी…”

मनी माफिया ही मालिका काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शीत करण्यात आली आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर तुरूंगाबाहेर आले होते. त्यानंतर मनी माफियाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वकिलामार्फत अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरीला कायदेशीर नोटीस पाठवली. अरूण गवळी यांच्यावतीने वकील आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांनी संबंधीत नोटीस बजावली आहे. अरूण गवळी यांना पैसे दिल्याशिवाय भायखळ्यात इमारत बांधू शकतो का? त्याचा विचारही करता येणार नाही? मालिकेतील अशा संवादांवरही या नोटीसद्वारे आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतोय नाहीतर…”, राज ठाकरेंकडून कोश्यारींचा समाचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरुण गवळी यांच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न आहे. त्या पार्श्वभूमीवर रजेची मागणी गवळी यांनी केली होती. त्यानुसार गवळी यांना ४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. या रजेत पोलीस सुरक्षेसह गवळी यांनी मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने घालण्यात आली होती. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.