आर्यन खाननेच मला शाहरुख खानला फोन लावायला सांगितलं; केपी गोसावीचा दावा

केपी गोसावीने आर्यन खान प्रकरणात महत्वाचा खुलासा केला आहे.

Pune-police-issues-lookout-notice-against-Kiran-Gosavi-witness-in-a-cruise-drugs-case
(संग्रहित छायाचित्र)

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तो तुरुंगात आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून एनसीबीसह या संपूर्ण प्रकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच दरम्यान एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत अनेक खुलासे केले. प्रभाकर साईल हा केपी गोसावीचा सुरक्षा रक्षक आहे. साईलने यावेळी काही व्हिडीओ देखील पुरावे म्हणून दाखवले होते, यामध्ये केपी गोसावी हा आर्यन खानच्या शेजारी बसून होता. तसेच त्याने त्याच्या फोनवरून आर्यन खानचं बोलणं करवून दिलं होतं. याप्रकरणी केपी गोसावीने महत्वाचा खुलासा केला आहे.

केपी गोसावीने दावा केला आहे की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने त्याला त्याच्या पालकांना फोन लावून देण्याची विनंती केली होती. इंडिया टुडेशी फोनवर बोलताना केपी गोसावीने म्हटलं की, “आर्यन खानने मला त्याच्या मॅनेजरशी बोलण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी आर्यनजवळ त्याचा स्वतःचा फोन नव्हता. माझ्याजवळ माझा फोन होता. त्यामुळे आर्यन खानने मला फक्त त्याच्या पालकांना आणि मॅनेजरला फोन करण्याची विनंती केली होती.”

“एनसीबी कार्यालयात बसल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचं दिसतंय. काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली,” असा दावा प्रभाकर साईलने एबीपी माझाशी बोलताना केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan asked me to call shahrukh khan and manager claims kp gosavi hrc