मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नवी मुंबईत केलेल्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. खलील मैनुद्दीन सैयद (३०) व हशमुल्ला हसन शेख (२२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
हेही वाचा – मुंबई : १२ दुचाकी चोरल्याप्रकरणी अन्नपदार्थ घरी पोहोचवणाऱ्या तरुणाला अटक
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दोघेही नवी मुंबईतील कामोठे परिसरात राहत असल्याची माहिती एटीएस, विक्रोळी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पडताळणीत दोघेही बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींविरोधात भारतीय पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.