पुरातन वारसा वास्तू समितीकडून अद्याप  मंजुरी नाही

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) पुनर्विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सीएसएमटी इमारत व परिसराचा पुनर्विकास खासगी विकासकांमार्फत करण्यात येणार आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या पुरातन वारसा वास्तू समितीला सादर करण्यात आला असून अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी सुमारे १,३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ऐतिहासिक दर्जा असलेल्या सीएसएमटी स्थानकात उपनगरीय रेल्वेसाठी सात फलाट आहेत. येथून सीएसएमटी ते कसारा, खोपोली मुख्य मार्गाबरोबरच हार्बर पनवेल लोकलही सुटतात. याशिवाय मेल, एक्स्प्रेससाठीही फलाट आहेत. या स्थानकात मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. शिवाय या रेल्वे स्थानकाला परदेशी पर्यटकही भेट देतात. अशा स्थानकाचा पुनर्विकास करताना ऐतिहासिक वारसा जपण्यात येणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर सीएसएमटी परिसरात ‘रेल मॉल’ही उभारण्याचा विचार आहे. 

सीएसएमटीचा पुनर्विकास सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर करण्यात येणार होता. यासाठी एकाच कंपनीची निवड केली जाणार होती, परंतु हा निर्णय रद्द करून आता हायब्रीड बील्ड ऑपरेट पद्धत अवलंबली जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि खासगी ६० टक्के गुंतवणूक असेल. यामुळे प्रकल्प खर्चही १,६०० कोटी रुपयांवरून १,३५० कोटींवर आला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पुरातन वारसा वास्तू समितीची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी पालिकेकडे पाठवण्यात आला आहे. प्रत्यक्ष होणारे काम, ऐतिहासिक वास्तूची हानी होणार नाही याबाबतच्या माहितीसह अन्य आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. याबरोबरच रुची प्रस्ताव काढण्यात येणार असून पूर्वी निवड केलेल्या कंपन्यांनाच पुनर्विकास व गुंतवणुकीसाठी संधी दिली जाणार आहे.