आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी अटक केली. चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रॅलीच्या आयोजकांची ही पहिलीच अटक आहे.
अहमद रझा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट होते. यापूर्वी त्याला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) निकेत कौशिक यांनी सांगितले. पुरवणी आरोपपत्रात त्याच्यावरील आरोप निश्चित करण्यात येणार आहेत.
अहमद रझा याने मुंबई पोलिसांकडे ११ ऑगस्टच्या रॅलीची परवानगी मागणारे पत्र दिले होते. या सभेला फक्त एक हजार माणसे येतील, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक लोक या सभेला उपस्थित होते. त्याने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी सांगितले.
रॅलीत झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला होता तर ९२ जण जखमी झाले होते. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या ६४ झाली आहे. त्यापैकी ५ जणांना न्यायालयाने पुराव्या अभावी यापूर्वीच निर्दोष सोडले आहे. तर ४५ जणांना जामीन मंजूर झाला आहे. या हिंसाचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी एकूण ३ हजार ५०० जण फरार दाखविले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
आझाद मैदान रॅलीचा आयोजक रझा याला अटक
आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मदिन उल इल्म या संघटनेचा सरचिटणीस अहमद रझा याला सोमवारी अटक केली. चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रॅलीच्या आयोजकांची ही पहिलीच अटक आहे.
First published on: 05-12-2012 at 06:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azad maidan rally arranger ahmed raza is arrested