एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूने कदम कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर |bandra worli sea link accident Security Guard Chetan Kadam death shock family mumbai | Loksatta

एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूने कदम कुटुंबावर शोककळा ; वांद्रे-वरळी सी लिंकवर झाला होता अपघात

वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातातील जखमींच्या मदतीला धावलेल्या चेतन यांच्यावर काळाने घाला घातला.

एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूने कदम कुटुंबावर शोककळा ; वांद्रे-वरळी सी लिंकवर झाला होता अपघात
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये सुरक्षा रक्षक चेतन कदम यांचाही समावेश आहे. घराची आर्थिक घडी सांभाळणाऱ्या चेतन यांच्या निधनाने कदम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर होणारे अपघात किंवा वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास सुरक्षा रक्षकांना किंवा पर्यवेक्षकांना बोलावले जाते. त्याच पर्यवेक्षकांपैकी चेतन कदम एक.

एल्फिन्स्टन येथील स्वराज्य गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशी असलेले कदम नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. वडिलांच्या निधनानंतर मोठा मुलगा म्हणून चेतन यांनी आई आणि आपल्या लहान भावाला सांभाळ केला. वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातातील जखमींच्या मदतीला धावलेल्या चेतन यांच्यावर काळाने घाला घातला. पाच वर्षांपूर्वी सागरी सेतूवर आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण त्यांनी वाचवले होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ, पत्नी, साडेतीन वर्षांचा मुलगा असे कुटुंब आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उच्च न्यायालयाने संमती दिल्यामुळे २४० सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

संबंधित बातम्या

‘गुजरात निवडणुकीसाठी जाणे अधिकृत काम आहे का?’ वाढीव वीजदेयक आंदोलन सुनावणीस अनुपस्थिवरुन न्यायालयाने नार्वेकर, लोढांना फटकारले
पोलिसांना सहा महिन्यांपासून प्रवासभत्ता नाही!; तक्रार करणाऱ्या फौजदारावरच कारवाई
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लाॅक; रविवारचा लोकल प्रवास टाळण्याचे आवाहन
मुंबईमधील जोडपं Live Stream करत होतं Sex Video; गायकाच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु
मुंबईत अल्पवयीन मुलीवर टेम्पोमध्ये बलात्कार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs NZ: मायकल वॉनने धवन-लक्ष्मणच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘टीम इंडिया जुन्या….!’
BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा
पुण्यात बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षांनंतर झाला उघड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
“ज्या माणसाने दारू पिऊन…” जितेंद्र आव्हाडांची गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका!
युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब