वांद्रे-वरळी सागरी सेतुवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना येत्या १ एप्रिलपासून टोलसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत. या मार्गावरील एकेरी प्रवासासाठी आता ५५ ऐवजी ६० रूपये द्यावे लागणार आहेत. तर, दुहेरी प्रवासाचा टोल ९० रूपये इतका करण्यात आला. यापूर्वी वाहनधारकांना त्यासाठी ८२.५० रूपये मोजावे लागत होते. वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गावरील टोल दर तीन वर्षांनंतर वाढेल, अशी तरतुद सुरूवातीलाच करार करताना करण्यात आली होती. त्यानुसार १ एप्रिलपासून टोल वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक पासधारकांनाही १ एप्रिलपासून २७५० रुपयांऐवजी तीन हजार रुपये मोजावे लागतील.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2015 रोजी प्रकाशित
वांद्रे-वरळी सागरी सेतुवरील टोल १ एप्रिलपासून ६० रुपयांच्या घरात
वांद्रे-वरळी सागरी सेतुवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना येत्या १ एप्रिलपासून टोलसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.
First published on: 21-03-2015 at 12:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra worli sea link toll hiked to rs