साम्यवादी विचारवंत आणि वेदांचे अभ्यासक बानी देशपांडे यांचे फुफ्फुसातीस संसर्गामुळे शुक्रवारी सकाळी धन्वंतरी इस्पितळात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी खासदार रोझा देशपांडे, एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. साम्यवादी चळवळीचे भीष्माचार्य कॉ. डांगे यांचे ते जावई होत. बानी देशपांडे यांनी स्वातंत्र्य चळवळीत तसेच साम्यवादी चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. ‘युनिव्हर्स ऑफ वेदांत’, ‘मार्क्सवादी दर्शनची वैदिक परंपरा’, ‘कम्युनिस्ट मूव्हमेन्ट अॅण्ड इंडियन नॅशनल काँग्रेस’ ही पुस्तके त्यांनी लिहिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2015 रोजी प्रकाशित
बानी देशपांडे यांचे निधन
बानी देशपांडे यांनी स्वातंत्र्य चळवळीत तसेच साम्यवादी चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.
Written by रत्नाकर पवार
First published on: 05-12-2015 at 01:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bani deshpande no more