मुंबई: शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दहा वर्षांच्या दोन, तर १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा – Shilpa Shetty and Raj Kundra : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, घर आणि ऑफिसवर ईडीची धाड

हेही वाचा – ‘एन डी’ स्टुडिओचा ताबा अखेर शासनाकडे; महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाकडे व्यवस्थापनाची जबाबदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत बुधवारी ही घटना घडली. शाळेच्या इमारतीमधील उद्वाहन नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त करण्यासाठी याठिकाणी दोन कर्मचारी आले होते. यापैकी एका कर्मचाऱ्याने १० वर्षांच्या दोन आणि १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. घरी परतल्यानंतर मुलींनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा (२७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.