माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्गा चॅरिटेबल ट्रस्टने माहीम दग्र्यात ६०३व्या उरुसच्या निमित्ताने गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’चा घोष करण्यात आला. सुरुवातीला बिगुलाच्या निनादात राष्ट्रध्वज फडकविण्यात येऊन ‘भारत माता की जय’चा घोष करण्यात आला. उपस्थित मुस्लिम भाविकांनीही ‘भारत माता की जय’च्या घोषणेत आपला सूर मिसळला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ट्रस्टचे अध्यक्ष सोहेल खंडवानी, रिझवान र्मचट आदी उपस्थित होते.
‘गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही,’ असे वक्तव्य करून ओवेसी यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याचीच री ओढत त्यांच्या पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनीही ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार दिला होता. या प्रकरणी त्यांना विधिमंडळाचे अधिवेशन संपपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर माहीम दग्र्यात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा देण्यात आली, याला विशेष महत्व दिले जात आहे.