शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, तरीही आज प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळाच्या बाहेर पत्राकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या अटकेबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “हे सर्व उद्योग…”

काय म्हणाले भास्कर जाधव?

अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही. आमचं मुख्यमंत्रीपद गेलं, ४० आमदार गेले, १३ खासदार गेले, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची सुरक्षा काढण्यात आली, अशी गोष्टींना आम्ही घाबरलो नाही, तर यांच्या व्हीपला आम्ही कसे घाबरणार? असे कित्येक व्हीप आम्ही बघितले आणि गेले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली.

हेही वाचा – मतदान करताना भाजपाचं उपरणं घालणं हेमंत रासनेंना भोवणार? विरोधकांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल

भाजपा ही केवळ जुमला पार्टी

पुढे बोलताना त्यांनी शिंदे गट भाजपा सरकारवरही जोरदार टीकास्र सोडलं. शिंदे सरकारच्या काळात शेतकरी हवालदिल झाला आहे. जुनी पेशंन योजना लागू करणे, मराठा, लिंगायत आणि धनगर समाजाला आरक्षण, ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार देऊ, अशी अनेक आश्वासने या सरकारने दिली होती. मात्र, अद्याप एकही आश्वासन यांनी पूर्ण केलं नाही. भाजपा ही केवळ जुमला पार्टी आहे. हे लोक केवळ सत्तापिपासू लोक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेनं ५५ आमदारांना बजावला व्हीप, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीसांवर कोणाचाही विश्वास नाही. महाराष्ट्राचं अतिशय सुसंस्कृत, वैचारिक राजकारण देवेंद्र फडणवीसांना खराब केलं. फडणवीसांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवलं. त्यांनी आपल्याच सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचं फोन टॅपिंग केलं. त्यामुळे फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राची उच्च परंपरा डागाळली गेली, महाराष्ट्राची वैचारिक बैठक विस्कळीत झाली. त्यामुळे त्यांनी कितीही उसणं अवसान आणून वक्तव्ये केली, तरी महाराष्ट्र फडणवीसांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यांचा पक्षही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही”, अशी टीका त्यांनी केली.