वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय भविष्य यावर मोठं विधान केलं आहे. “मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही,” असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबरच्या बैठकीत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही. तुम्ही हे लिहून ठेवा. ही मुस्लिमांची ताकद आहे. यावेळी बदलाची लाट मुस्लिमांमधून येईल. २०२४ मध्ये मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही हा सर्वांना विश्वास आहे.”

हेही वाचा : “शिवसेना संपवल्याचा अमित शहांना आसुरी आनंद” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात म्हणाले, “आमच्या नादी लागाल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशात धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘मुस्लीम समाजाची सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील पिळवणूक, मूलभूत समस्या आणि संवैधानिक उपाय’ या अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पैगंबर बिल संदर्भातही चर्चा झाली,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत दिली.