लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवर मिशन रफ्तार प्रकल्पाचे काम सुरू असून मिशन रफ्तारअंतर्गत मुंबई – सुरत – वडोदरा – दिल्ली आणि मुंबई – वडोदरा – अहमदाबाद या महत्त्वाच्या विभागांवर ताशी १६० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम करण्यासाठी विरार – सूरतदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ९.१० ते १०.३० दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि रेल्वेगाड्यावर परिणाम होणार आहे.

Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?
Pune, Metro Line, Extensions, PMRDA, Mahametro, Clash, Project Responsibility,
पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा

आणखी वाचा-शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलासा नाही!

पश्चिम रेल्वेवरील विरार – सूरतदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर रविवारी सकाळी ९.१० ते १०.३० या काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२९३४ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस रविवारी २५ मिनिटे विलंबाने धावेल. तर, रविवारी सकाळी ७.१७ ची चर्चगेट – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. रविवारी सकाळी ९.३७ वाजेची डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोडऐवजी वाणगाववरून सकाळी ९.५० वाजता सुटेल. रविवारी सकाळी ७.४२ ची चर्चगेट – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, रविवारी सकाळी १०.१० ची डहाणू रोड – विरार लोकल डहाणू रोडऐवजी सकाळी १०.२५ वाजता वाणगाववरून सुटेल.