मुंबई : कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे लागणार आहे. या भागातील रहिवाशांना पवई निम्नस्तर जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयाच्या संरचनात्मक दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. संरचनात्मक दुरूस्ती केलेल्या पवई निम्नस्तर जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ मधून सोमवार, २३ जून २०२५ पासून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
पवई जलाशयाच्या एका भागाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून या भागातून येत्या सोमवारपासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार, २३ जून २०२५ नंतर पुढील ३ ते ४ दिवस कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातील व भांडूप, विक्रोळीचा समावेश असलेल्या ‘एस’ विभागातील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
या भागातील रहिवाशांनी पाणी गाळून व उकळून प्यावे
‘एल’ विभाग – बरेली मशीद, ९० फुटी मार्ग, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता (लिंक रोड), सावरकर मार्ग, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवाह उद्योग मार्ग, सत्यनगर पाईपलाईन मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सकाळी ६.०० ते दुपारी २.०० वा.)
कुर्ला दक्षिण परिक्षेत्र : काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरा नगर, संगम वसाहत, शास्त्री नगर, घास कंपाऊंड, ख्रिश्चन गाव, मसरानी गल्ली, गाझी मिया दर्गा मार्ग, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैलबाजार, संदेश नगर, क्रांती नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, कमानी, कल्पना सिनेमागृह, किस्मत नगर, गफूर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मील मार्ग, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, स. गो. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, एल. आय. जी. – एम. आय. जी. कॉलनी, विनोबा भावे नगर, एच. डी. आय. एल. संपूर्ण संकुल, नौपाडा, प्रीमिअर वसाहत, सुंदरबाग, शिव टेकडी, संजय नगर, कपाडिया नगर, रुपा नगर, तकिया विभाग, मॅच फॅक्टरी गल्ली, शिवाजी कुटीर गल्ली, टॅक्सीमन वसाहत, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, चाफे गल्ली – चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर, जरीमरी माता मंदिर परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.)
‘एस’ विभाग – मोरारजी नगर, भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार वसाहत, रेनेसेन्स हॉटेल परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.)