मुंबई महापालिकेचे खड्डे सामान्य जनतेला त्रासदायक वाटत असले तरी मुंबई पोलिसांना मात्र त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. रविवारी रात्री पप्पू विश्वकर्मा हा तरूण चारकोप येथून जात असता इनोव्हा गाडीतून आलेल्या चौघांनी त्याला चाकूचा धाक दाखवून लुटले. ते चौघे पळून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यातील दोघांना गाडीत बसता आले नाही. दरम्यान, ते चोर असल्याचा प्रकार आजूबाजूंच्या लोकांच्या लक्षात आला आणि लोकांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण उर्वरित दोन चोर गाडीतून पळून गेले. पोलिस त्यांचा तपास घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
पालिकेच्या खड्ड्यांमुळे सापडले दोन चोर
मुंबई महापालिकेचे खड्डे सामान्य जनतेला त्रासदायक वाटत असले तरी मुंबई पोलिसांना मात्र त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे.
First published on: 11-08-2014 at 12:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc potholes helped arrest thief