मुंबईतील यशराज फिल्म स्टुडिओला महानगरपालिकेने अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. स्टुडिओत करण्यात आलेल्या अवैध बांधकामासाठीच ही नोटीस बजावण्यात आली आहे. स्टुडिओतील पार्किंगचा व्यावसायिक कामांसाठी वापर केला जात होता. त्यासोबतच ठरलेल्या आराखड्यामध्येही काही फेरबदल करण्यात आल्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलल्याचे कळत आहे.

पालिकेने बजावलेल्या या नोटीसमध्ये असेही म्हणण्यात आले आहे की, स्टुडिओमध्ये असणाऱ्या भिंतीसुद्धा मोठ्या बांधण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक कामांसाठी केला जात असल्यामुळेच स्टुडिओ अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. स्टुडिओमध्ये बांधण्यात आलेली भिंत पाडण्यात आली नाही किंवा पार्किंगच्या भागात होणारा स्टुडिओचा व्यावसायिक वापर बंद करण्यात आला नाही तर याविषयी कडक कारवाई करण्याचा इशारा पालिकेतर्फे देण्यात आला आहे.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

काही दिवसांपूर्वीच स्टुडिओला ही नोटिस बजावण्यात आली होती. तेव्हा आता एक महिन्याच्या मुदतीमध्ये या नोटिशीमध्ये बजावण्यात आलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली नाबही, तर यशराज स्टुडिओच्या काही भागावर पालिकेचा हातोडा पडण्याची चिन्हं आहेत. तेव्हा आता या प्रकरणी स्टुडिओच्या मालकांकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.