bmc stop action against abandoned vehicles for past few months zws 70 | Loksatta

बेवारस वाहने हटवण्याची मोहीम थंडावली ; विल्हेवाटीसाठी योग्य जागेचा मुंबई पालिकेकडून शोध

बेवारस वाहने ठेवण्यासाठी असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन जागा शोधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला

बेवारस वाहने हटवण्याची मोहीम थंडावली ; विल्हेवाटीसाठी योग्य जागेचा मुंबई पालिकेकडून शोध
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : रस्त्यांच्या कडेला टाकून दिलेली जुनी बेवारस वाहने जप्त करण्याची मुंबई महापालिकेची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. या वाहनांच्या विल्हेवाटीसाठी जागाच मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. माहूलमध्ये वाहनांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेला दिलेली जागा उंचावर असल्याने त्यांचा वापर करण्यात येत नाही.

जुनी किंवा गुन्ह्यांतील अनेक वाहने रस्त्याच्या कडेला ठेवली जातात. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते. तसेच त्यांचा वाहतुकीलाही अडथळा होतो. त्यामुळे ती महापालिकेकडून हटवली जातात. मात्र करोनाकाळात ही जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे देण्यात आली होती. तर करोना निर्बंध हटवल्यानंतर मार्च महिन्यात ही जबाबदारी पुन्हा महापालिकेकडे आली. तेव्हापासून महापालिका आणि वाहतूक विभागाने मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबवून बेवारस वाहने हटवली. आता बेवारस वाहने ठेवण्यासाठी असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन जागा शोधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याला ‘एसआरए’कडून प्रतिसाद मिळाला असून माहूल येथे १० हजार चौरस मीटर जागा मिळाली. मात्र ती उंचावर असल्यामुळे त्याचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, या वाहनांच्या विल्हेवाटीसाठीच्या जागेसंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लस अमृतमहोत्सवाला मुंबईत अल्प प्रतिसाद ; केवळ साडेचार लाख नागरिकांना वर्धक मात्रा

संबंधित बातम्या

मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
मुंबई : अंधेरीमध्ये तरूणाची हत्या
मुंबई: प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा
धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश 
विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
“हा अधिकार…” लग्नात बायकोकडून कुंकू लावून घेणाऱ्या राजकुमार रावचं वक्तव्य चर्चेत
“आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट