bombay hc relief anil ambani in tax evasion case zws 70 | Loksatta

कर चुकवल्याप्रकरणी अनिल अंबानींना तूर्त दिलासा

अंबानी यांना प्राप्तिकर विभागाने ८ ऑगस्ट रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती.

कर चुकवल्याप्रकरणी अनिल अंबानींना तूर्त दिलासा
उद्योगपती अनिल अंबानी (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या ८१४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अघोषित निधीवरील ४२० कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीविरोधात रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन त्यावर प्राप्तिकर विभागाला १७ नोव्हेंबपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच तोपर्यंत अंबानी यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेशही दिले.

अंबानी यांना प्राप्तिकर विभागाने ८ ऑगस्ट रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीविरोधात अंबानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंबानी यांनी हेतुत: त्यांचे परदेशी बँक खात्याचे तपशील आणि आर्थिक नफा भारतीय कर अधिकाऱ्यांसमोर उघड केला नाही, असा आरोप प्राप्तिकर विभागाने नोटिशीत केला होता.   काळा पैसा प्रतिबंधक कायदा २०१५ मध्ये लागू करण्यात आला आणि कथित व्यवहार हे २००६-०७ आणि २०१०-११ या वर्षांच्या मूल्यांकनाचे आहेत, असा दावा करून अंबानी यांनी प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीला आव्हान दिले आहे.  तसेच कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाऊ शकत नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्राप्तिकर विभागाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पीएफआय प्रकरण : पाच जणांना ३ ऑक्टोबपर्यंत एटीएस कोठडी

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांना मदत
कुर्ला-नाहूर पट्टय़ात घरे महाग
महाराष्ट्राची शान असलेल्या ‘कोयना’ धरणाची कथा सांगणारा लघुपट व्हायरल
आदिवासी विभागातील डॉक्टरांना कोणीच वाली नाही!
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, ठाण्यातील युवक जखमी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
INDW vs AUSW 1st T20: ऑस्ट्रेलियाचा भारतावर ९ विकेट्सने मोठा विजय; बेथ मुनीच्या झंझावातापुढे टीम इंडियाने टेकले गुडघे
पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जलधर आराखडे; भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर
“तडजोड करणार नाही,” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचल्यानंतर ठाकरे गट संतापला, म्हणाले “केंद्राला आणि वरिष्ठांनाही जुमानत…”
“मी वसंतरावसाठी आम्हाला ९ वर्षं लागली कारण…” दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीचा खुलासा
मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीची बळजबरी! Sex Video शूट करुन ब्लॅकमेलींग; घरातील कुड्यांमध्ये लावलेली गांजाची रोपटी