मुंबई : हुतात्मा चौक येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा शुक्रवारी दुपारी फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली.
सुरक्षा पथके इमारतीची कसून तपासणी करत आहेत. कृपया कायदा अंमलबजावणीला सहकार्य करा, दहशत पसरवू नका आणि अधिकारी सुरक्षित घोषित करेपर्यंत परिसरापासून दूर रहा, असे आवाहन उच्च न्यायालय प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, यामुळे हुतात्मा चौक परिसरात वाहतूक कोंडीदेखील झाली आहे.