मुंबईमध्ये साध्या टपरीपासून ते सेव्हन स्टार हॉटेलपर्यंत खाण्याच्या अनेक जागा आहेत. त्यामध्ये एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटची भर पडली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेवर आधारित ‘बोगी वोगी’ हे रेस्टॉरंट नुकतच सुरु झालं आहे. हे रेस्टॉरंट एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये तयार करण्यात आलं असून गेल्या अनेक महिन्यांपासून या डब्याला रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम सुरू होतं.

रेल्वेची वाट बघत असलेल्या प्रवाशांसोबतच बाहेरील नागरिकदेखील ‘बोगी वोगी’ मध्ये जाऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. या रेस्टॉरंटमध्ये एका वेळी चाळीस ग्राहक बसू शकतात. रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात आपण बसून ऑर्डर देऊन खाऊ शकतो तर दुसरीकडे उभ्याउभ्या वडापाव, सॅंडविच, ज्यूस, सॉफ्टड्रिंक अशा पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो. आसनसोल स्थानकात अशाप्रकारे रेल्वे डब्यात सुरु करण्यात आलेलं रेस्टॉरंट आहे. मध्य रल्वेच्या सीएसएमटी स्थानकात ‘बोगी वोगी’ हे दुसरे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने सुरु केलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलमधून मध्य रेल्वेला काही वर्षात ४० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होणार आहे.