मुंबई : दक्षिण मुंबईतील महर्षि कर्वे मार्गावर चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर (पूर्व) बेस्टच्या बसला गुरुवारी १० च्या सुमारास भाषण आग लागली. आगीत बस भस्मसात झाली. या बसमधील आठ प्रवासी, चालक आणि वाहक सुखरूप आहेत. दरम्यान, आयपीएल सामन्यामुळे गुरुवारी रात्री या परिसरात गर्दी होती.

कामावरून घरी परतणारे नोकरदार गुरुवारी रात्री १० च्या सुमारास चर्चगेट स्थानकात पोहोचत होते. त्याच वेळी बस क्रमांक १२१ या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुव धारण केले आणि बस आगीच्या विळख्यात अडकली. घटनेचे वृत्त समजताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

यावेळी बसमध्ये एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. आयपीएलचा सामना असल्याने आज चर्चगेट परिसरात गर्दी होती. मात्र बसला आग लागताच पोलिसांनी दुर्घटना स्थळानरून नाहरिकांना हटविले. तसेच या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.